

अंबरनाथ, ता. २० (वार्ताहर) : शहरातील ‘एस-३ पार्क’ हॉटेलमध्ये १० एप्रिलला २६ वर्षीय सिमरन पाटील हिच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हा प्रकार आत्महत्येचा नसून नियोजित हत्येचा असल्याचा आरोप मृत तरुणीचे वडील उमेश पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संशयित आरोपीविरोधात पोलिस उपायुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
सिमरन हिला संशयित आरोपीकडून चालवल्या जाणाऱ्या कथित अनधिकृत कॉल सेंटरमधील परदेशी नागरिकांची फसवणूक, तसेच हवाला व्यवहारांबाबत माहिती मिळाली होती. या बेकायदा कामांबाबत तिने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केल्याने ती मानसिक तणावाखाली होती. याच कारणातून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच घटनेच्या दिवशी त्याने हॉटेलमध्ये स्वतःच्या नावाने खोली बुक करून सिमरनला तेथे बोलावले. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणाची केवळ ‘अकस्मित मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला असून, तक्रार केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.