जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय खुले : आमदार संजय केळकर

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय खुले : आमदार संजय केळकर
Published on

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय खुले : आमदार संजय केळकर

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २० : ठाणे शहरातील वाढत्या समस्या आणि विविध विकास प्रकल्पांबाबतचे निर्णय हे लोकशाहीच्या माध्यमातून घेतले गेले पाहिजेत. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय नागरिकांसाठी खुले राहील, असे मत भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. सोमवारी (ता. २०) ठाणे महापालिकेतील भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्‍घाटन केळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.

ठाणे महापालिकेत महासभा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला असला, तरी स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्या अद्याप गठित झालेल्या नाहीत. यावरून प्रश्न उपस्थित करीत केळकर म्हणाले, की दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असताना समित्या गठित करण्यास एवढा विलंब का होत आहे? आता अडीच महिने झाले, अजून किती वेळ लागणार, असा सवालदेखील केळकर यांनी विचारला. तसेच सभागृहात कोणताही विषय जबरदस्तीने रेटून नेणे किंवा महत्त्वाचे विषय टाळणे, हे भाजप सहन करणार नाही. सभागृहात प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य असून कामकाज नियमांनुसारच व्हावे, ही आमची भूमिका आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही नेहमीच सकारात्मक राहू. ठाणेकरांच्या हितासाठी जे काही योग्य असेल त्याला भाजपचा पाठिंबा असेल, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आता लोकप्रतिनिधी सत्तेत आले असून, सर्व नगरसेवकांना जबाबदाऱ्या देणे गरजेचे आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी स्थायी व इतर समित्या लवकरात लवकर गठित कराव्यात, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com