लोखंडी प्लेटची मानपाड्यातून चोरी

लोखंडी प्लेटची मानपाड्यातून चोरी
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे : मानपाडा परिसरात मेट्रो कामाशी संबंधित लोखंडी गर्डर जॉइनिंग प्लेटची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीत सुमारे एक लाख १० हजारांच्या मालाचा समावेश असल्याची माहिती आहे.
मानपाडा येथील रहिवासी अतुल रेपाळे (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ एप्रिलला ते आपल्या कंपनीच्या साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून रात्रपाळीत कार्यरत होते. त्यांच्यासोबत नरेश राणा हेही कर्तव्यावर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसपाळीवरील सुरक्षारक्षक बाबासाहेब सातपुते यांनी फोन करून लॉकिम कंपनीजवळील मेट्रो कंटेनर चौकी परिसरात ठेवलेल्या लोखंडी गर्डर जॉइनिंग प्लेट दिसत नसल्याची माहिती दिली. यानंतर रेपाळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एकूण ६० लोखंडी गर्डर जॉइनिंग प्लेट चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com