सदानंद गायकवाड यांना समाज भूषण पुरस्कार

सदानंद गायकवाड यांना समाज भूषण पुरस्कार
Published on

सदानंद गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार

कल्याण (वार्ताहर) : बीएसएनएल कल्याणतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक, बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळ, कल्याणचे कोषाध्यक्ष, समता संघर्ष संघटन कल्याणचे उपाध्यक्ष, भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य सदानंद गायकवाड यांना सरस्वती आई घरडे फाउंडेशन, अकोला या संस्थेतर्फे ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष गौतम नथुजी घरडे यांच्या हस्ते गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. या वेळी भूपेश माळवे उप परिमंडळ सचिव सेवा महाराष्ट्र परिमंडळ, प्रधान महाप्रबंधक बीएसएनएल महेश कुमार, उपमहाप्रबंधक कल्याण दिलीपकुमार जातव, वित्त सल्लागार प्रीतेश शिंदे, सहाय्यक महाप्रबंधक प्रशासन राजेशकुमार गुप्ता, विजय ढोबळे खजिनदार सेवा महाराष्ट्र परिमंडळ, प्रदीप शेजवळ अध्यक्ष सेवा कल्याण जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com