

मराठी भाषेला प्राधान्य द्या!
व्यवसाय करणाऱ्यांना प्रताप सरनाईक यांच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : राज्यातील व्यावसायिकांनी मराठी भाषेला प्राधान्य देणे आवश्यक असून, “महाराष्ट्रात काम करायचे असेल, तर मराठी आलीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. ठाण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील लोकमान्यनगर येथे विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचे उद्घाटन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, इतर राज्यांमध्ये स्थानिक भाषेला महत्त्व दिले जाते. मग महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे चुकीचे नाही, त्याचप्रमाणे रिक्षा व टॅक्सीचालकांना किमान मराठी समजणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत १ मेपासून सुरू करण्यात आलेली मोहीम यापुढेही कायम राहणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मिरा-भाईंदर परिसरात मराठी न येणाऱ्या वाहनचालकांची पडताळणी सुरू असून, लवकरच त्याचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी सक्तीचा निर्णय हा नवीन नसून काही वर्षांपासून अमलात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर “सरकार कोणत्याही दबावाला झुकणार नाही,” असा इशाराही मंत्री सरनाईक यांनी दिला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाचे स्वागत करीत मिरा-भाईंदरमध्ये मराठी शिकवणी उपक्रम सुरू केले आहेत. सरनाईक यांनी या उपक्रमाचेही स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.