उन्हाची तीव्रता कमी करतायेत थंडगार ताडगोळे

उन्हाची तीव्रता कमी करतायेत थंडगार ताडगोळे
Published on

उन्हाची तीव्रता कमी करताहेत थंडगार ताडगोळे

अलिबाग, ता. २० (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना ताडगोळे थंडावा देत आहेत. अलिबाग शहरात सध्या ठिकठिकाणी ताडगोळे विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
ताडगोळे हे उन्हाळ्यात आरोग्यदायी फळ मानले जाते. पारदर्शक, मऊ व रसाळ ताडगोळ्यांत भरपूर प्रमाणात पाणी आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास तसेच उष्माघाताचा धोका कमी करण्यास ते उपयुक्त ठरतात. ताडगोळ्यांचा गर पारदर्शक, मऊ आणि रसाळ असल्याने तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. अलिबागमध्ये गोंधळपाडा, बाजारपेठ, एसटी स्टॅंड या भागांमध्ये रस्त्याकडेला ताडगोळ्याचे स्टॉल दिसू लागले आहेत.

रोजगार उपलब्ध
अलिबागमधील चैल आणि रेवदंडा परिसरात ताडाची झाडे आढळतात. या झाडांपासून मिळणाऱ्या ताडगोळ्यांच्या विक्रीमुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असून, हा व्यवसाय शेतीला पूरक पर्याय म्हणून पुढे येत आहे. घरी रात्री उशिरापर्यंत ताडगोळे सोलण्याचे काम सुरू असते आणि पहाटे हे ताजे फळ बाजारात विक्रीसाठी आणले जाते. अनेक ठिकाणी विक्रेते ग्राहकांसमोरच ताडगोळे सोलून देत असल्याने त्यांची मागणी आणखी वाढते. सध्या बाजारात १०० रुपयांना आठ ते नऊ ताडगोळे मिळत आहेत. स्थानिकांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी करीत आहेत.

आरोग्यासाठीही फायदेशीर
ताडगोळे हे केवळ थंडावा देणारेच नव्हे, तर पचनासाठीही फायदेशीर आहेत. त्यात असलेले पोषक घटक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. तसेच त्वचेसाठीही ते लाभदायक ठरतात. वाढत्या तापमानामुळे ताडगोळे नैसर्गिक, स्वस्त आणि आरोग्यदायी पर्याय ठरत असून, उष्णतेत शरीराला थंडावा देणारे हे नैसर्गिक ‘एनर्जी फूड’ म्हणूनही ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com