

मुहूर्तावर १,०४४ घरांची खरेदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रविवारी (ता. २०) अनेकांनी घरखरेदीचे स्वप्न साकार केले. दिवसभरात तब्बल १,०४४ घरांच्या नोंदणीचे करार झाले, तर अनेकांनी विकसकांच्या कार्यालयात हजेरी लावून घराचे बुकिंग केले. दिवसभरात झालेल्या घरांच्या नोंदणीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ५१ कोटी रुपयांच्या महसुलाची भर पडली आहे.
जागतिक स्तरावरील अस्थिरता आणि सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या चढ-उतारांमुळे यंदा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नेहमीप्रमाणे घरांची विक्री होणार का, अशी चिंता रियल इस्टेट क्षेत्रातून व्यक्त केली जात होती. सर्वसामांन्यांसह मध्यमवर्गीय आणि गुंतवणूकदारांनी घर, दुकानांच्या खरेदीला पसंती देत दिवसभरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे १,२५० खरेदी करारनामे केले. त्यापैकी १,०४४ करारनामे घरांच्या आणि दुकानांच्या खरेदी-विक्रीचे आहेत. त्यावरून युद्धजन्य परिस्थितीत अनेकांकडून रियल इस्टेट क्षेत्राकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.