

प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल?
रेल्वे रुळाशेजारी तरुणाचा गळफास
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : तुर्भे नाका येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने वाशी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाशेजारील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. १९) मध्यरात्री घडली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत तरुणाचे नाव एजाज आलम शेख (२९) असे असून, तो कोपरखैरणे येथील रहिवासी आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून तो तुर्भे नाका परिसरात आपल्या मित्रांसोबत राहत होता. रविवारी (ता. १९) रात्री त्याने वाशी रेल्वे स्थानकाकडून मानखुर्दच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकदरम्यान एका निर्जन ठिकाणी झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्याने तत्काळ रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. वाशी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश भोसले आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वाशीतील मनपा रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय अहवालानुसार गळफास घेतल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
-------------------------
प्रेमप्रकरणातील नैराश्यातून टोकाचे पाऊल?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाजचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नात्यातील तणावामुळे तो प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय त्याच्या आईने व्यक्त केला. त्यानुसार वाशी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.