कल्याण पूर्वेत अतिक्रमणाविरोधात कारवाई

कल्याण पूर्वेत अतिक्रमणाविरोधात कारवाई
Published on

कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग ५-डी क्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणाविरोधात सोमवारी (ता. २०) कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

चक्की नाका, गावदेवी चौक, चेतना स्कूल परिसर, १०० फूट रोड, विजयनगर ते आमराई तसेच तिसगाव नाका या प्रमुख भागांत मोहीम राबविण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, टपऱ्या आणि स्टॉल जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले, तर विक्रीसाठी ठेवलेला माल जप्त करण्यात आला. पालिकेच्या या कारवाईत एकूण ६९ हातगाड्या, सहा टपऱ्या आणि पाच लोखंडी स्टँड हटविण्यात आले. या मोहिमेनंतर अनेक ठिकाणी रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त झाल्याचे चित्र दिसून आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com