जव्हारच्या सुमारे चार हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतिक्षा

जव्हारच्या सुमारे चार हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतिक्षा
Published on

कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
जव्हार तालुक्यातील चार हजार लाभार्थी उपेक्षित

जव्हार, ता. २१ (बातमीदार) ः निसर्गाच्या लहरीपणाबरोबर महागाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्यांचा आधार घेत कर्ज घेतले आहे. अशातच राज्य शासनाने दोन लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती आहे; मात्र अधिकृत सूचना नसल्याने जव्हार तालुक्यातील चार हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीककर्ज योजनेत पात्र राहणार असल्याचे सांगितले; मात्र योजनेसाठीचे अंतिम निकष अजूनही जाहीर झालेले नाहीत. शासकीय व निमशासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, आयकर भरणारे तसेच यापूर्वी कर्जमाफी घेतलेले शेतकरी वगळले जाण्याची शक्यता आहे. चारचाकी वाहन, बंगला असलेले अपात्र ठरण्याच्या चर्चेमुळे ग्रामीण भागात नाराजीचा सूर आहे.
---------------------------
अडचणींचा फेरा
सप्टेंबर २०२५ नंतर प्रकारची पीक कर्जे मध्यम मुदत, दीर्घ मुदतीचे, वैयक्तिक कर्ज योजनेत वगळली जाऊ शकतात. अल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी जमीन क्षेत्राची मर्यादा ठरवली जाऊ शकते. तसेच, दोन लाखांपर्यंत कर्जमाफी लागू असल्याने त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अंशतः दिलासा मिळेल. त्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
---------------------------
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली; मात्र निकष जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज फेडीचा पर्याय ठरवणे सोपे झाले असते.
- एकनाथ दरोडा, अध्यक्ष, सरपंच संघटना
--------------------
सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्यानुसार सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली असून कर्जमाफी नेमकी केव्हा होईल, याची तालुक्यातील अनेक शेतकरी वाट पाहत आहेत.
- काशिनाथ दरोडा, लाभार्थी, झाप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com