यशवंत सृष्टीत सांडपाण्याचा कहर

यशवंत सृष्टीत सांडपाण्याचा कहर
Published on

यशवंत सृष्टीत सांडपाण्यातून पायपीट
बोईसर, ता.२१ (वार्ताहर) : खैरा पाडा ग्रामपंचायत हद्दीतील यशवंत सृष्टी परिसरात सांडपाण्यामुळे येथील मुख्य रस्ता पाण्याखाली आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून पायपीट करावी लागते.
रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे साचलेले घाण पाणी थेट नागरिकांच्या अंगावर उडत आहे. शाळकरी मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार चेंबर जाम होणे, वाहिनी फुटल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनेक दिवसांपासून समस्या असूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com