

नायगाव ते घोडबंदर जलप्रवासाचे संकेत
स्नेहा दुबे-पंडित यांची ‘रो-रो’बाबत नितेश राणेंशी चर्चा
विरार, ता. २१ (बातमीदार) ः वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी नायगाव (जूचंद्र) ते घोडबंदरदरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणेंची भेट घेतली. या वेळी वसईत अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत त्यांनी केली.
वसई तालुका पारंपरिक मत्स्यव्यवसायासाठी ओळखला जातो. हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेचा हा प्रमुख स्रोत आहे. या क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केली आहे. या केंद्रामार्फत तंत्रज्ञान, हॅचरी व्यवस्थापन, केज कल्चर, ऑर्नामेंटल फिशरी व मत्स्यसंवर्धन, मत्स्यप्रक्रिया, पॅकेजिंग व मूल्यवर्धन, कोल्ड चेन व्यवस्थापन, रेडी-टू-ईट उत्पादन निर्मिती तसेच सागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण युवकांना देता येणार आहे.
------------------
महिला सक्षमीकरणाला चालना
वसईत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, तसेच महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगात सहभागीतून आर्थिक सक्षमीकरण होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.