वसई तालुक्यात फक्त पाणजू ग्रामपंचायतीसाठी मतदान

वसई तालुक्यात फक्त पाणजू ग्रामपंचायतीसाठी मतदान
Published on

पाणजू ग्रामपंचायतीत निवडणुकीचे बिगुल
एका जागेसाठी दोन अर्ज, राजकीय हालचालींना वेग

विरार, ता. २१ (बातमीदार) ः वसई तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीनुसार पाणजूतील जागेसाठी दोन अर्ज आले आहेत. तर तीन ग्रामपंचायतींत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर दोन जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही.
वसई तालुक्यात निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर कारणांमुळे रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात खाडर्डी-डोलीव, चंद्रपाडा, शिरवली, पाणजू, माजिवली-देपिवलीस रानगाव अशा सहा ग्रामपंचायतींमधील सात जागांचा समावेश आहे. १७ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.
-----------------------
तीन ठिकाणी बिनविरोध
पाणजू ग्रामपंचायतीतील सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या प्रभाग २ (अ) या जागेसाठी चार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी दोघांनी अर्ज मागे घेतले. तर खार्डी-डोलीव, माजिवली-देपिवली, रानगाव ग्रामपंचायतीमधील जागांसाठी तीन अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिरवली ग्रामपंचायतीतील दोन जागा, चंद्रपाडा ग्रामपंचायतीतील जागेसाठी एकही अर्ज आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com