महालक्ष्मी डोंगर परिसरात भीषण वणवा

महालक्ष्मी डोंगर परिसरात भीषण वणवा
Published on

महालक्ष्मी डोंगर होरपळला
वणवा रोखण्यात वनविभागाला यश
कासा, ता.२१ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी डोंगर परिसरातील चोरबाव भागात सोमवारी सायंकाळी भीषण वणवा लागला होता. काही काळात आग वेगाने पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कासा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक, वनपाल, वनमजूर तसेच अग्निरक्षक पथकाने शर्थीचे प्रयत्न करून वणव्यावर नियंत्रण मिळविले आहे.
वणव्यामुळे परिसरातील अनेक लहान-मोठी झाडे, झुडपे तसेच औषधी वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. याचा परिणाम वन्यजीवांवरही होत असून त्यांची नैसर्गिक अधिवासस्थाने उद्ध्वस्त झाले आहे. परिणामी, अन्न व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याने गाव व शहर परिसरात त्यांचा वावर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली कुंपणे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वनविभागाकडून आगीच्या नेमके कारणांचा तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार आग मानवनिर्मित असण्याची शक्यता आहे.
-----------------------
नागरिकांना आवाहन
मार्च, एप्रिल, मे मध्ये वणव्याच्या घटनांमध्ये वाढ होते. यामुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच वनक्षेत्रात आग लावणे, ज्वलनशील वस्तू टाकणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
---------------------
माहिती मिळताच कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. ही आग मानवनिर्मित असावी, असा अंदाज असून नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
- सुजय कोळी, वन अधिकारी, कासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com