अलिबागमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाउस

अलिबागमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाउस
Published on

अलिबागमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाउस
आंबा बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक धास्तावले
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः अलिबाग तालुक्यात मंगळवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. रायगड जिल्ह्यात तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी यामुळे आंबा बागायतदारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. उष्णतेत वाढ होऊन पारा सुमारे ३२ ते ३५ अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे रायगडकर बेजार झाले होते. दुपारच्या वेळेस बाजारपेठा ओस पडत होत्या. अशातच मंगळवारी पहाटेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे उन्हाने हैराण झालेले नागरिक सुखावले. मात्र, अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. आधीच हवामानातील बदलांमुळे यावर्षी दहा ते पंधरा टक्के आंबा पिक हाती लागण्याची शक्यता आहे. अशातच, आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेले पीक खराब होण्याची भीती बागायतदारांना आहे. यासोबतच ठिकठिकाणी बांधकामे सुरू असल्याने वीटभट्टी व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत सुरू होता. कडक उन्हामुळे वीटाही सुकण्यास सोपे होते. मात्र, आता मुसळधार पावसाने वीटा भिजून मोठा आर्थिक फटका वीटभट्टी व्यावसायिकांना सहन करावा लागणार आहे.

पुढील तीन दिवस अवकाळीचा इशारा
रायगड जिल्ह्यात तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com