

पाणीटंचाईने संताप अनावर
वाड्यातील हंडा मोर्चा दुसऱ्या दिवशीही सुरू
वाडा, ता.२१(बातमीदार)ः तालुक्यातील पाणीटंचाईवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पण प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने श्रमजीवीने आंदोलन तीव्र केले आहे.
वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेला हंडा मोर्चा दुसऱ्या दिवशीही अधिक तीव्र स्वरूपात करण्यात आला. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते महिला रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. चुली पेटवून आंदोलन सुरू ठेवण्यात येत असून हा लढा अधिक संघटित होत आहे. यावेळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
------------------------------
दैनंदिन जीवन विस्कळीत
वाडा तालुक्यातील ५४ गावांतील ८० पाड्यांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिलांना दररोज लांब अंतर चालत जाऊन पाणी आणावे लागत असून काही ठिकाणी अजूनही अस्वच्छ पाण्यावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.