चोरट्यांवर श्रीवर्धन पोलीसांची ड्रोन नजर.

चोरट्यांवर श्रीवर्धन पोलीसांची ड्रोन नजर.
Published on

चोरट्यांवर आता ड्रोनद्वारे नजर
पोलिसांचे कडक पाऊल; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
श्रीवर्धन, ता. २१ (वार्ताहर) ः गेल्या महिन्यात श्रीवर्धन शहरातील विठ्ठल आळी आणि पोद्दार चाळ परिसरात झालेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. चोरटे चोरी करून डोंगराच्या दिशेने पळून जात असल्याचे समोर आल्यानंतर, आता श्रीवर्धन पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी थेट ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
शहरात एकापाठोपाठ दोन ठिकाणी कडीकोयंडा तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सतर्क होत आपापल्या परिसरात रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान नागरिकांनी काही संशयितांचा पाठलाग केला असता, ते डोंगरमार्गे पळून जात असल्याचे निदर्शनास आले. चोरटे सायंकाळच्या सुमारास डोंगरावरून खाली उतरत असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिस आणि नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आला होता. यानुसार चोरट्यांच्या या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. जीवनाबंदर डोंगर पट्टयात काही संशयास्पद हालचाली आढळल्या नसल्याचे श्रीवर्धन पोलिसांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी आता अफवांवर विश्वास ठेवू नये. संशय आल्यास पोलिसांना कळवा‌, संशयित व्यक्ती डोंगर पट्टयात पळून गेली असल्यास ड्रोनने पाहणी करता येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com