नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडकोची अतिक्रमणविरोधी विशेष मोहिमे

नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडकोची अतिक्रमणविरोधी विशेष मोहिमे
Published on

नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडकोचा बुलडोझर
शेकडो अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

उलवे, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील वाढत्या अतिक्रमणांविरुद्ध सिडको प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विमानतळ क्षेत्रातील सुरक्षा आणि नियोजित कामात अडथळा ठरणारी शेकडो कच्ची बांधकामे, अनधिकृत धाबे आणि टपऱ्या सिडकोने नुकतीच विशेष मोहिमेअंतर्गत बुलडोझर फिरवत जमीनदोस्त केल्या आहेत.
आम्र मार्ग आणि विमानतळाच्या कंपाउंडच्या मधल्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत धाबे, चहाच्या टपऱ्या, पान स्टॉल, ताडी-माडीची दुकाने आणि कच्च्या स्वरूपातील बांधकामे उभारण्यात आली होती. या वाढत्या अतिक्रमणांमुळे परिसराच्या सुरक्षेवर आणि नियोजनावर परिणाम होत असल्याची गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर सिडकोने विशेष पथक तैनात करून अतिक्रण पूर्णपणे जमीनदोस्त केले. सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले, की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रकल्प असून, त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसर अतिक्रमणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com