पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद
Published on

तोतया पोलिस आंबिवलीतून जेरबंद
एक लाख ४५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त
मनोर, ता.२१ ः मनोर बाजारपेठ भागात पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाकत एक लाख ४५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मनोर गावातील दामोदर चाफेकर (वय.५७) आठवडा भरापूर्वी सकाळी साडे अकराच्या सुमारास मच्छीमार्केट परिसरात गेले होते. यावेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्तीने पोलिस असल्याचे सांगत पुढे चोरीच्या घटना घडत आहेत. तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढून ठेवा, असे सांगून त्यांनी विश्वास संपादन केला. यावेळी आरोपींनी दामोदर चाफेकर यांच्याकडील एक लाख ४५ हजारांची सोन्याची चैन, अंगठी घेऊन घटनास्थळावरून फरार झाले होते. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहितीच्या आधारे जावेद जाफरीला (वय२८) कल्याण शहरातील अंबिवली-मंगळनगर भागातून ताब्यात घेतले. आरोपीकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.


कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मनोर पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com