अनधिकृत होर्डिंगवर सिडकोचा हातोडा

अनधिकृत होर्डिंगवर सिडकोचा हातोडा
Published on

अनधिकृत होर्डिंगवर सिडकोचा हातोडा
नैना परिसरात मोठी कारवाई
पनवेल, ता. २१ (वार्ताहर) : पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे जाहिरात होर्डिंग कोसळून अपघात घडू नयेत, यासाठी सिडको प्रशासनाने अनधिकृत फलकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. नैना परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे बेकायदा जाहिरात फलक उभारणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सिडको हद्दीत नैनासह विविध भागांमध्ये नियमांचे उल्लंघन करून आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात जाहिरात होर्डिंग उभारण्यात आले होते. विशेषतः महामार्गालगत उभारलेले हे फलक वादळी वाऱ्याच्या काळात धोकादायक ठरू शकतात, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत बांधकामे (नैना) विभागाने शुक्रवारी (ता. १७) विशेष मोहीम राबवली.
पनवेल-पळस्पे परिसरातील सर्व्हे क्र. ९२/३ (खंडोबा हॉटेलसमोर) तसेच अरिहंत बिल्डिंगजवळील सर्व्हे क्र. ७ येथील फलकधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीही संबंधितांनी फलक न हटवल्याने अखेर सिडकोने कारवाई करीत हे फलक जमीनदोस्त केले.
ही कारवाई मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलिस उपमहानिरीक्षक सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य नियंत्रक प्रशांत भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत अतिक्रमण नियंत्रण विभाग, स्थानिक पोलिस, महावितरण अधिकारी आणि सुरक्षा पथकांचा सहभाग होता. कारवाईसाठी क्रेन, हायड्रा, ट्रक आदी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
चौकट
धोकादायक फलकांवर नियंत्रण
महामार्गालगत उभारलेले अनधिकृत होर्डिंग वादळी वाऱ्यांमध्ये कोसळून मोठे अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सिडकोने अशा फलकांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. भविष्यातही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com