वैद्यकीय मदतीसाठी ‘स्मार्ट’ प्रणाली

वैद्यकीय मदतीसाठी ‘स्मार्ट’ प्रणाली
Published on

वैद्यकीय मदतीसाठी ‘स्मार्ट’ प्रणाली
आरोग्‍य योजनांसाठी वॉर रूम; मुख्यमंत्र्यांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीचे लोकार्पण मंगळवारी (ता. २१) करण्यात आले. राज्यातील ३,००० पेक्षा अधिक सरकारी व खासगी रुग्णालयांचे जाळे या योजनेत समाविष्ट असून, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून जवळील रुग्णालय, रक्तपेढी आणि रुग्णवाहिका सेवा सहज शोधता येतात.
बेड मॅनेजमेंट प्रणालीमुळे धर्मादाय रुग्णालयांतील बेड उपलब्धतेची माहिती रिअल-टाईम पाहता येणे शक्य होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या कामकाजाचा आढावा व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीचे उद्‌घाटन तसेच राज्यामध्ये कार्यरत आरोग्यविषयक योजनांचे एकत्रीकरण करण्यात येऊन वॉर रूम स्थापन करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे नवीन ऑनलाइन प्रणालीची माहिती दिली.

आता ही कामे होणार सुलभ
- अर्ज स्थिती ट्रॅक करता येईल.
- अर्जाच्या मंजुरीनंतर ३० टक्के रक्कम तत्काळ, तर उर्वरित ७० टक्के रक्कम वर्ग केली जाईल.
- रिअल-टाइम वॉर रूम मॉनिटरिंग
- आर्थिक सहाय्याची मंजुरी केवळ आठ तासांत मिळेल.
- पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया
- रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज नाही, रुग्णालयातूनच अर्ज सादर होईल.
- कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी
- मंजूर निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा
- हेल्पलाइन व डिजिटल मार्गदर्शन
- मोबाइल अ‍ॅपद्वारे रुग्णालय शोधता येणार

राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com