जिल्हा रुग्णालयात किरकोळ शस्त्रक्रिया रखडल्या

जिल्हा रुग्णालयात किरकोळ शस्त्रक्रिया रखडल्या
Published on

ठाणे शहर, ता. २१ (बातमीदार) : विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका जिल्हा सामान्य रुग्णालयाला बसला. संपामध्ये चतुर्थ श्रेणीपासून दुसऱ्या श्रेणीपर्यंत कर्मचारी सहभाग घेतला. त्यामुळे अनेक रुग्णांच्या किरकोळ शस्त्रक्रिया पार पडू शकल्या नाहीत. बाह्य रुग्णालय विभागावरदेखील संपाचा परिणाम झाला. रुग्णालयात उपचार करता आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच माघारी फिरावे लागले.

जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी मंगळवार (ता.२१)पासून बेमुदत संपावर आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, गट ‘ड’ चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, तांत्रिक कर्मचारी तसेच नर्सेस फेडरेशन यांच्या वतीनेही प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी संप केला. या संपाचा थेट परिणाम रुग्णालयातील कामकाजावर झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे (जिल्हा रुग्णालय) अध्यक्ष अनिल घेगडमल, नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा स्नेहा ठाकूर, तसेच तांत्रिक विभागाचे मनोहर गरजे, शर्मिला पठारे आदींच्या नेतृत्वाखाली परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते.

अत्यावश्यक सेवा सुरू!
जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी संपात सहभागी असले तरी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. डॉक्टर आणि परिचारिका रुग्णसेवेसाठी कार्यरत असल्याने आपत्कालीन सेवा अबाधित असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com