भिवंडीत ऑईल गोदामाता भीषण आग

भिवंडीत ऑईल गोदामाता भीषण आग
Published on

ऑईल गोदामाला भीषण आग

भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) ः भिवंडी शहरालगतच्या खोणी हद्दीतील मूलचंद कम्पाउंड या ठिकाणी असलेल्या ऑईल गोदामात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात औद्योगिक कामासाठी वापरलेले ऑईल मोठ्या लोखंडी टाक्यांमध्ये साठवणूक करून ठेवले होते. त्यामुळे ही आग सर्व गोदामात पसरली. त्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. आगीमुळे गोदामातील सर्व ऑईल साठा खाक झाला. या घटनेची माहिती भिवंडी अग्निशामक दलास मिळाल्यानंतर दोन गाड्या ताबडतोब घटनास्थळी दाखल होत त्यांनी या आगीवर दोन तासांत नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग नक्की कशामुळे लागली, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com