डोंबिवलीत ‘आरपीआय’मध्ये गटबाजी उफाळली

डोंबिवलीत ‘आरपीआय’मध्ये गटबाजी उफाळली
Published on

डोंबिवली, ता. २१ : शहरातील राजकीय वर्तुळात सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची जोरदार चर्चा रंगली आहे. एकाच पक्षातील दोन गट आमनेसामने आल्याने परिस्थिती चिघळली असून, हा वाद थेट विष्णूनगर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. पक्षातील अंतर्गत मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष रस्त्यावर मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पक्षाचे पदाधिकारी विकास खैरनार यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २०) तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार कर्वे रोड परिसरातून जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव याच्यासह संदीप पाईकराव, नितीन इंगोले आणि सुभाष अंभोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

हा वाद नवीन नसल्याचेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी सुभाष अंभोरे यांनी विकास खैरनार यांच्याविरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात खैरनार यांना अटक झाली होती आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. आता खैरनार यांनी प्रत्यारोप करीत गुन्हा दाखल केल्याने दोन्ही गटांतील जुना वाद पुन्हा पेटल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com