१६०० चौरस फुटाच्या घरासाठी रहिवासी सकारात्मक

१६०० चौरस फुटाच्या घरासाठी रहिवासी सकारात्मक
Published on

१,६०० चौरस फुटांचे घर!
मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाबाबत रहिवासी सकारात्मक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना १,६०० चौरस फूट बिल्टअपऐवजी १,६०० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचे घर देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत रहिवाशांनी सकारात्मक भूमिका घेतानाच आम्हाला पुनर्विकास हवा असल्याचे आज गोरेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत कायम संवाद ठेवून रहिवाशांच्या जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्यावर आमचा भर असेल, अशी भूमिका मोतीलालनगर जनकल्याणकारी समिती, मोतीलालनगर रहिवासी विकास संघ आणि मोतीलालनगर पुनर्विकास समन्वय समितीने घेतली आहे.
वर्षानुवर्षे आम्ही मोतीलालनगरचा पुनर्विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील आहोत. आता कुठे पुनर्विकास मार्गी लागताना दिसत आहे. त्यानुसार म्हाडाकडून पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण केले जात असताना काही रहिवासी आणि व्यावसायिक गाळेधारकांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून चुकीचे हावभाव केले. त्यामुळे सादरीकरण पूर्ण होऊ शकले नाही. तसेच रहिवाशांना असलेल्या शंका, प्रश्न मांडता आले नाहीत. त्यामुळे आमच्या शंका, प्रश्न मांडण्याची संधी हुकली असली तरी आम्ही म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी १,६०० चौरस फूट कार्पेटचे घर देण्यास सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करीत असल्याचे मोतीलालनगर जनकल्याणकारी समितीच्या अध्यक्षा माधवी राणे यांनी स्पष्ट केले. घराच्या क्षेत्रफळाशिवायही आमच्या अन्य मागण्या आहेत. त्या पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही म्हाडाचे अधिकारी आणि राज्य सरकारसोबत संवाद कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तिन्ही संघटनांनी एकत्रित आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मोतीलालनगर रहिवासी विकास संघाचे अध्यक्ष मल्हारी भिसे, मोतीलालनगर पुनर्विकास समन्वय समितीचे सरचिटणीस संतोष परब, गौरव राणे आदी उपस्थित होते.
़़़़
या मागण्यांसाठी प्रयत्न करणार
- सध्या आम्हाला दोन लाख रुपये काॅर्पस् फंड दिला जाणार आहे, तो २५ लाखांपर्यंत वाढवावा.
- रहिवाशांना की टू की घरे मिळावीत.
- पुढील २० वर्षांकरिता मेंटेनन्स फ्री करावा.
- मोठ्या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार १,६०० चौरस फुटामध्ये तीन घरे तयार करून मिळावीत.
- पार्किंग मिळावे.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com