उद्याने, मैदानांतही आता पोलीसांची गस्त

उद्याने, मैदानांतही आता पोलीसांची गस्त
Published on

उद्याने, मैदानांतही आता पोलिसांची गस्त
बाजार व उद्यान समिती अध्यक्षांनी वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः काही उद्यानांत अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, दादागिरी तसेच समाजविघातक घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून सामाजिक शांततेला बाधा पोहोचत आहे, याकडे बाजार व उद्यान समिती अध्यक्षांनी पोलिसांचे लक्ष वेधले आहे. अशी उद्याने, मनोरंजन व खेळाच्या मैदानात पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी समिती अध्यक्षांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

नागरिकांना विरंगुळा, शुद्ध व ताज्या हवेची गरज लक्षात घेता, उद्याने, मनोरंजन मैदाने व खेळाची मैदाने ही नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहेत; मात्र मुंबईतील शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमधील अनेक उद्याने व मैदानांमध्ये सायंकाळनंतर असामाजिक तत्त्वांचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईत एकूण ३२५ उद्याने, ३६९ खेळाची मैदाने, ४८० मनोरंजन मैदाने असून नागरिकांना अधिकाधिक मोकळी जागा उपलब्ध करून देणे व हरित क्षेत्र टिकवून ठेवणे हे महापालिकेचे धोरण आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

समाजविघातक कारवायांना आळा बसेल व नागरिक निर्धास्तपणे मैदाने, उद्याने याठिकाणी वेळ घालविता येईल, यासाठी पोलिस बंदोबस्त व नियमित गस्त वाढविणे गरजेचे असल्याने पालिकेच्या अध्यक्षा, बाजार व उद्यान समिती हेतल विमल गाला यांनी पोलिस आयुक्त, मुंबई यांना मुंबईतील सर्व उद्याने, मनोरंजन मैदाने व खेळाची मैदाने या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिस गस्त वाढविण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com