

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट
कर्मचारी संपात सहभागी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून सुरू केलेल्या बेमुदत संपामुळे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता. जवळपास ९० टक्क्यांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प होते. त्यामुळे आपले काम घेऊन आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली.
राज्य सरकारने आमच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुढाकार न घेतल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात क वर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या ४७५, तर ड वर्गाची संख्या ८४ आहे. त्यापैकी ४६८ कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आज कार्यालयात कर्मचारीच नसल्याने संपूर्ण काम ठप्प झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आपल्या कामासाठी आलेल्या नागरिकांची कोंडी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.