पीसीबी सीईटीला ९३.४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

पीसीबी सीईटीला  ९३.४८  टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
Published on

पीसीबी सीईटीला ९३.४८ टक्के विद्यार्थी
मुंबई, ता. २१ : राज्यातील औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षेस आज दोन्ही सत्रांत मिळून ५१,३३९ विद्यार्थ्यांपैकी ४७,९९३ विद्यार्थ्यांची म्हणजेच ९३.४८ टक्के उपस्थिती होती. या पीसीबी सीईटी परीक्षेस राज्यातील एकूण ३,३४६ विद्यार्थी अनुपस्थित होते. ३६ जिल्ह्यांतील १८७ परीक्षा केंद्रावर ही सीईटी परीक्षा घेण्यात आली.
यावर्षी पीसीबी समूहाच्या या अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या सीईटीसाठी राज्यात दोन लाख ८४ हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २१ एप्रिल ते २६ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी व दुपारी अशा दोन बॅचनुसार परीक्षा घेण्यात येत आहे. सकाळच्या सत्रात पीसीबी समूहाच्या सीईटी परीक्षेला ९३.४५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, तर दुपारच्या सत्रात ९३.५१ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, या सीईटीला मुंबई शहर आणि उपनगरांतून सकाळच्या सत्रात एक हजार ५८४, तर दुपारच्या सत्रात एक हजार ५०७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com