नवी मुंबईतील तरुण कर्जतच्या पळसदरी धरणात बुडून बेपत्ता; शोधकार्य सुरू

नवी मुंबईतील तरुण कर्जतच्या पळसदरी धरणात बुडून बेपत्ता; शोधकार्य सुरू
Published on

नवी मुंबईतील तरुण
धरणात बुडून बेपत्ता

कर्जत, ता. २१ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात मंगळवारी (ता. २१) सायंकाळी नवी मुंबईतील एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. आर्यन थापर (२०) असे या तरुणाचे नाव असून, तो घणसोली येथील रहिवासी होता.

आर्यन हा खारघर येथील भारती विद्यापीठात बीसीएचे शिक्षण घेत होता. तो आपल्या मित्रांसह पळसदरी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. पाच ते सहा विद्यार्थ्यांचा गट धरणाजवळ आला असताना आर्यन पोहता येत असल्याने उतरला. मात्र पाण्याची खोली न समजल्याने तो अचानक बुडाला.
ही दुर्घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून मदत मागितली. स्थानिक ग्रामस्थांनी कर्जत पोलिसांना तत्काळ ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले.
रेस्क्यू पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली, मात्र धरणातील दाट जलवनस्पतींमुळे शोधकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. उशिरापर्यंत आर्यनचा कोणताही मागमूस लागला नव्हता. दरम्यान, बुधवारी सकाळी बोट आणि अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या सहाय्याने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती रेस्क्यू टीम सदस्य भक्ती साठेलकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com