डायल ११२च्या धावत्या मदतीने तरुणाला मिळाले जीवनदान

डायल ११२च्या धावत्या मदतीने तरुणाला मिळाले जीवनदान
Published on

एक कॉल आणि मृत्यूवर मात!
डायल ११२च्या तत्पर मदतीने तरुणाला जीवनदान


बोईसर, ता. २२ (वार्ताहर) : मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तरुणाला ‘डायल ११२’च्या तत्पर सेवेने अक्षरशः नवजीवन दिल्याची थरारक घटना बोईसर एमआयडीसी परिसरात घडली आहे. पोलिसांच्या वेगवान प्रतिसादामुळे अवघ्या काही मिनिटांत परिस्थिती पालटली आणि एका कुटुंबाचा आधार वाचला.

मंगळवारी (ता. २१) सायंकाळी ५.३० वाजता कंट्रोल रूमला अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार संदीप कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या सहा मिनिटांत ते घटनास्थळी पोहोचले असता, दुचाकीस्वार तरुण रस्त्याकडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव सुरू होता. या वेळी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता.

कदम यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने जखमीला उचलून खासगी वाहनातून तुंगा हॉस्पिटलमध्ये अवघ्या १५ मिनिटांत दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच मृत्यूच्या छायेत असलेल्या तरुणाचे प्राण वाचले. आणखी काही मिनिटे उशीर झाला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अपघातग्रस्त रितेश यादव (२६) याच्या डोक्याला १५ टाके पडले असून, हाताला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्याच्यावर डहाणू येथील वेदान्त हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
---------
२४ तास सेवा
दरम्यान, रितेशच्या वडिलांनी डोळ्यांत अश्रू आणत पोलिस देवासारखे धावून आल्याची भावना व्यक्त केली. पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी नागरिकांना आवाहन करीत ‘डायल ११२’ ही २४ तास जीवनरक्षक सेवा आहे. अपघात असो वा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, एक कॉल तुमचा जीव वाचवू शकतो, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com