वाहतूक नियमांचे उल्लंघनाविरोधात कारवाईचा बडगा .

वाहतूक नियमांचे उल्लंघनाविरोधात कारवाईचा बडगा .
Published on

वाहतूक नियम उल्लंघनाविरोधात कारवाईचा बडगा

तारापुर, ता. २२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्राणघातक अपघाताच्या अनुषंगाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (ता. २०) एकाच दिवशी बेशिस्त वाहनचालकांविरोधात व्यापक स्वरूपात केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाती घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्ते सुरक्षा नियम उल्लंघनामुळे प्राणघातक अपघात होत आहेत. पालघर शहरामध्ये मागील १५ दिवसांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये चार जणांना आपला प्राण गमवावा लागला. त्याचप्रमाणे प्रवासी, अवजड आणि गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेदरकार वाहतूकप्रकरणी पालघर जिल्हा वाहतूक शाखेकडे नागरिकांच्या सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत.

याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी अनिल व्हटकर व पोलिस उपनिरीक्षक संदीप नागरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संध्याकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा चार ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे महामार्गावरील खानिवडे ते चारोटी आणि चारोटी ते अच्छाड या दोन टप्प्यांत दुचाकीवरून गस्त सुरू करण्यात आली.
-----------------------
बेशिस्त वाहनचालकांना दंड

नाकाबंदी आणि गस्तीदरम्यान ६७ हलक्या आणि जड वाहनांच्या अतिवेगाप्रकरणी एक लाख ६२ हजार रुपये, नियमबाह्य मार्गिका बदलल्याप्रकरणी १७ वाहनांविरोधात आठ हजार ५०० रुपये, चार जणांविरोधात मद्यपान करून वाहन चालविणे आणि इतर वाहतूक नियमांचा भंग अशा एकूण ३६२ कारवायांत तीन लाख ७३ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com