

ठाण्यात वाहन धुण्यास
१० जूनपर्यंत बंदी
ठाणे, ता. २१ : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने ठाणे महापालिकेने पाणी बचतीसाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे व साफसफाईच्या कामांवर १० जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
महापालिकेच्या आदेशानुसार दोन, तीन, चारचाकी तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांचे धुणे व साफसफाईची कामे या कालावधीत बंद राहणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. गाड्या धुणे, अंगण धुणे, नळ सुरू ठेवणे अशाप्रकारे होणारा पाण्याचा अपव्यय तातडीने थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.