खडवलीत नदीकाठी तरुणाचा मृतदेह

खडवलीत नदीकाठी तरुणाचा मृतदेह
Published on

टिटवाळा (वार्ताहर) : खडवली गावाजवळील नदीकाठी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. २१) सापडलेल्या या मृतदेहावरून हा खून असल्याचा संशय व्यक्त केला जात असून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्तीचे अंदाजे वय २५ ते ३० दरम्यान असल्याचे सांगण्यात येत असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच संशयित आरोपींना गजाआड करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com