

अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात सामाजिक उपक्रम
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर): क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे नुकतेच आयोजन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्टुडंट कौन्सिल कमिटीच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत मानी व भुते येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील आरोग्य व्यवस्थापन,ॲनिमिया निर्मूलन तसेच हिपॅटायटीस ‘बी’ लसीकरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश होता.
महात्मा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. सुधाकर बांटेवाड, डॉ. विशाल उबाले, आरसीएफचे रमेश कवळे तसेच रक्तपेढीचे डॉ. गोसावी यांची उपस्थिती होती. विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.