सफाई व कंत्राटी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वितरणासाठी २.१९ कोटींचा प्रस्ताव

सफाई व कंत्राटी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वितरणासाठी २.१९ कोटींचा प्रस्ताव
Published on

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय
सफाई व कंत्राटी कामगारांच्या मुलांसाठी २.१९ कोटींची शिष्यवृत्ती
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून शहराची सेवा करणाऱ्या सफाई कामगारांच्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल दोन कोटी १९ लाख ३४ हजार ४०० रुपयांच्या शिष्यवृत्ती वितरणाचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवला आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून, सफाई कामगार व कंत्राटी कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. या योजनेच्या प्रथम टप्प्यात दोन हजार ७२५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, त्यासाठी एकूण दोन कोटी १९ लाख ३४ हजार ४०० रुपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील हा खर्च ‘सफाई कामगार, कंत्राटी कामगार व इतर शिष्यवृत्ती’ या लेखाशीर्षांतर्गत करण्यात येणार असून, त्यासाठी ४०० लाख रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी आयुक्तांमार्फत महासभेकडून प्रशासकीय व वित्तीय मंजुरीकरीता प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com