करपावतीसाठी पनवेल मधील झोपडपट्टी धारक आक्रमक

करपावतीसाठी पनवेल मधील झोपडपट्टी धारक आक्रमक
Published on

करपावतीसाठी पनवेलमधील झोपडपट्टीधारक आक्रमक
कामोठे, ता. २४ (बातमीदार) : पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील नवनाथनगर झोपडपट्टीवासीयांनी झोपड्यांना करपावती लागू करण्यासाठी पनवेल महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाने प्रेरित होऊन पनवेलमधील इतर शेकडो झोपडपट्टीधारक करपावती लागू करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
नवनाथनगर झोपडपट्टी ही सर्वाधिक मोठी झोपडपट्टी वसाहत आहे. या झोपडपट्टीत समारे ६५० झोपड्या आहेत. तत्कालीन नगर परिषदेच्या काळात या झोपडीधारकांना त्यांच्या घरांसाठी नियमितपणे करपावती दिली जात होती.
मात्र, महापालिका अस्तित्वात आल्यानंतर यातील अनेक झोपड्या अवैध ठरवून त्यांची करपावती अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अवैध ठरवल्यामुळे पालिकेकडून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. आपण उघड्यावर येऊ या भीतीने या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
झोपडपट्टीवासीयांनी नुकतेच महापालिकेसमोर उपोषण केले. या उपोषणाला महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक केतन भगत, नगरसेवक प्रकाश म्हात्रे, नगरसेवक राम पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनानंतर करपावतीच्या प्रतीक्षेत असलेले पनवेलमधील शेकडो झोपडीधारक महापालिकाविरोधात आंदोलनाच्या तयारीत आहेत. करपावती देताना महापालिका भेदभाव करत असल्याचा आरोप झोपडपट्टीधारक करत आहेत.

पनवेल महापालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना विभाग कार्यालयामार्फत २०१४ व २०१५ मध्ये झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण करून वैध झोपडपट्टीधारकांना व्हीआरपी पावतीचे वाटप केले होते.

यानंतरच्या कालावधीत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात काही झोपडपट्टीधारकांनी व्हीआरपी पावतीचा गैरवापर केल्याची तक्रार आयुक्तांना काही नगरसेवकांनी केली होती. या अनुषंगाने महापालिकेकडून करपावती देताना सावधानता, पारदर्शकता बाळगण्यात येत असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com