धारावी पुनर्विकासात हरित उपक्रमांचा समावेश

धारावी पुनर्विकासात हरित उपक्रमांचा समावेश
Published on

धारावी पुनर्विकासात हरित उपक्रमांचा समावेश
निसर्ग आणि आधुनिक विकासाची सांगड घालणारा मास्टर प्लान
धारावी, ता. २२ (बातमीदार) : दाटीवाटीच्या वस्तीत एकमेकांना खेटून उभ्या राहिलेल्या छोट्या छोट्या घरांमुळे तयार झालेले कोंदट आणि उष्ण वातावरण, पावसाळ्यात तुंबणाऱ्या गटारांमुळे जलमय झालेले रस्ते हे चित्र सुमारे १० लाख धारावीकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. दरम्यान, लवकरच स्वच्छ आणि हरित धारावीचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातून प्रेरणा घेऊन पुनर्विकासाचा मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रहिवाशांनी पाहिलेले स्वच्छ आणि हरित धारावीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
गजबजलेल्या वस्त्या, जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे रस्ते हे धारावीचे वास्तव कित्येक पिढ्या चालले आहे. मात्र हे चित्र बदलले, इथली परिस्थिती सुधारली आणि परिसर स्वच्छ झाला तर आमच्या आयुष्यातही नक्कीच सकारात्मक बदल घडेल, अशी आशा धारावीकरांना असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते संदीप कदम यांनी व्यक्त केली आहे.

तीन महत्त्वाचे उपक्रम
या मास्टर प्लानमध्ये तीन महत्त्वाच्या हरित उपक्रमांचा समावेश आहे. त्यातील पहिला उपक्रम म्हणजे हरित मार्गिका आहे. संपूर्ण धारावीत एका हरित मार्गिकेचे नियोजन करण्यात आले असून, मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासोबतच धारावीकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी ही मार्गिका महत्त्वाची भूमिका बजावेल. दुसरे म्हणजे सेंट्रल पार्कचे नियोजन आहे. सेंट्रल पार्क धारावीकरांना एकत्र येण्यासाठी, निसर्गाच्या सान्निध्यात आराम करण्यासाठी आणि निसर्गाशी आपली नाळ घट्ट जोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. यातील तिसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मिठी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

मिठी नदीचे पुनरुज्जीवन
अनेक वर्षांपासून प्रदूषित असलेल्या या नदीला पुनरुज्जीवित करून तिचे गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या नदीच्या किनाऱ्यावर सुंदर अशा ‘रिव्हरसाइड प्रोमोनेड’ची निर्मिती करण्यात येईल. पुनरुज्जीवनामुळे मिठीमधील जैवविविधता जपली जाईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल. या उपक्रमांमधून निसर्ग आणि आधुनिक विकास यांची सांगड घातली जाईल. अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे, निसर्गाशी असलेले रहिवाशांचे नाते आणखी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com