दुसऱ्याच्या कागदपत्रांवर मिळवले टेंडर

दुसऱ्याच्या कागदपत्रांवर मिळवले टेंडर
Published on

दुसऱ्याच्या कागदपत्रांवर मिळवले टेंडर
उरणमध्ये १.०९ कोटींचा भ्रष्टाचार उघड ः गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : उरण नगरपरिषदेच्या मालकीचा गाळा मिळवण्यासाठी एका व्यायामशाळा चालकाने चक्क एका नागरी अभियंत्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची एका कोटी ९ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उरण पोलिसांनी याप्रकरणी सागर मोहिते (४१) याच्या विरोधात फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे.
उरण नगरपरिषदेने सप्टेंबर २०१५ मध्ये बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल या इमारतीच्या तळ मजल्यावरील गाळा दोन वर्षाकरिता भाड्याने देण्यासाठी निविदा जाहीर केली होते. त्यावेळी सागर मोहिते याने गाळ्याची निविदा भरताना नागरी अभियंता वासुदेव पाटील यांचे पॅन कार्ड रेशन कार्ड व आयटी रिटर्न्सचा वापर केला होता. त्याचप्रमाणे त्याने निविदेसाठी व्ही.सी.पाटील एंटरप्रायझेस या नावाने बनावट लेटर हेड, बनावट गुमास्ता लायसन्स, बनावट मास्क आयडी आणि बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार केले होते. सर्व बनावट कागदपत्रे उरण नगरपरिषदेत सादर करून निविदा मिळवली होती. तेव्हापासून सागर मोहिते हा गाळ्यामध्ये व्यायामशाळा चालवत होता. मात्र, त्याने अद्यापपर्यंत गाळ्याचे भाडे उरण नगरपरिषदेला दिले नसल्यामुळे मागील १० वर्षांमध्ये सुमारे एक कोटी नऊ लाखांहून अधिक रकमेची थकबाकी निर्माण झाली आहे. पोलिसांनी सागर मोहितेच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अशी उघड झाली बनवटगिरी
गाळा वासुदेव पाटील यांच्या कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आल्याने उरण नगरपरिषदेने थकबाकी वसूलीसाठी त्यांना नोटीस पाठवली. त्यामुळे वासुदेव पाटील यांना धक्का बसला. त्यांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता सागर मोहिते याने त्यांच्या नावाने, बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची व शासनाची फसवणूक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी उरण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com