अपघाती मृत्यूप्रकरणी जेसीबीचालकावर गुन्हा दाखल

अपघाती मृत्यूप्रकरणी जेसीबीचालकावर गुन्हा दाखल
Published on

कासा, ता. २२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील धरमपूर-सायवन मार्गावर भुजाडी गावाजवळील मोठा माळ परिसरात जेसीबीच्या धडकेत एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात जेसीबीचालकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. धरमपूर पारसपाडा येथील लहू हरी हाडळ (५८) आणि त्यांचे जावई प्रदेश काशिनाथ कासट (४०) हे भुजाडी गावातील एसआरएम कंपनीच्या रस्ते बांधकाम ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शाकीब मोहम्मद अश्रफ नाईक (२३) याने जेसीबी (एमएच १२ वायडी ४२२३) भरधाव चालवून दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात लहू हाडळ यांच्या डोक्यावरून जेसीबी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर कासट हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता जेसीबी घटनास्थळी सोडून पळ काढला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उदय पाठक करीत असून, प्रभारी अधिकारी अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com