महासभेच्या वेळेवरून खडाजंगी

महासभेच्या वेळेवरून खडाजंगी
Published on

महासभेच्या वेळेवरून खडाजंगी
वेळ बदलाच्या निर्णयावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद, शेवटी सकाळी १० वाजता सभेचा निर्णय
वाशी, ता. २२ (बातमीदार): महापालिकेच्या एप्रिल महिन्यातील महासभेच्या वेळेवरून सोमवारी सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. प्रारंभी गुरुवारी सकाळी ९ वाजता सभा घेण्याचे नियोजन होते. मात्र, महिलांसाठी सोयीस्कर वेळ ठेवण्याचा प्रस्ताव मांडत वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले.
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी वेळेत मनमानी बदल केल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप नोंदवला. सर्व सदस्यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. याला सभागृह नेते सागर नाईक यांनी प्रत्युत्तर देत महापौरांच्या निर्णयाचे समर्थन केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हातवारे करत एकमेकांना इशारे देतानाचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, काही नगरसेवकांनी महिलांच्या सोयीचा मुद्दा उपस्थित करत सभा उशिरा घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी सोमवारी सभा तहकूब करून गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच सर्व सदस्यांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश दिले.
चौकट
वेळेत बदल
महासभेच्या वेळेतील बदल हा महिलांच्या सोयीसाठी करण्यात आला असला, तरी निर्णय प्रक्रियेत सर्व सदस्यांचा सहभाग असावा, या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com