देवमोगरा माता दर्शन वारीत आदिवाशी बांधवांचा सहभाग

देवमोगरा माता दर्शन वारीत आदिवाशी बांधवांचा सहभाग
Published on

देवमोगरा माता दर्शन वारीत आदिवासी बांधवांचा सहभाग

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : आदिवासी संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या देवमोगरा माता दर्शनासाठी विक्रमगड तालुक्यातील खुडेद गावातील आऊज वादक दिवाळ हरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली धरतरी ग्रुपतर्फे यंदाही भव्य दर्शन वारीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या वारीचे हे सलग तिसरे वर्ष असून, रविवार (ता. १९) ते मंगळवार (ता. २१) दरम्यान ही यात्रा उत्साहात पार पडली.

या वारीत नंदुरबार व गुजरात सीमेवरील विविध धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला होता. धरतरी ग्रुपने वारीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केल्याने भाविकांना तीन दिवसांत महत्त्वाच्या शक्तिपीठांचे व देवस्थानांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवशी रविवारी आदिशक्ती सप्तश्रृंगी माता दर्शनाने वारीची सुरुवात झाली. त्यानंतर मोठा देव, शबरीमाता व कनसऱ्या देव या देवस्थानांना भेट देण्यात आली. दुसऱ्या दिवशी सोमवारी नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथील देवमोगरा माता दर्शन घेण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्यातील निसर्गरम्य नालाकुंडा परिसराचे दर्शन घडविण्यात आले. तसेच तिसऱ्या दिवशी मंगळवारी गुजरातमधील देवमोगरा माता मंदिरात दर्शन घेऊन विस्तीर्ण परिसर पाहत यात्रेची सांगता करण्यात आली.
----------------
विशेष धार्मिक महत्त्व

या वारीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. नंदुरबार व गुजरात परिसरातील देवस्थानांना आदिवासी समाजात विशेष धार्मिक महत्त्व असून, या वारीमुळे भाविकांना एकाच वेळी अनेक पवित्र स्थळांचे दर्शन घेता आले. पालघर जिल्ह्यातील धरतरी ग्रुप गेल्या तीन वर्षांपासून अक्षय तृतीयेनिमित्त ही परंपरा जपत आहे. भाविकांच्या सोयीसाठी तसेच स्थानिक लोकसंस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी खुडेद येथून देवमोगरा माता दर्शन वारीचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती आयोजक संदीप पाटारा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com