उशिरा लागलेल्या सुट्ट्यांमुळे पालक-विद्यार्थ्यांत नाराजी

उशिरा लागलेल्या सुट्ट्यांमुळे पालक-विद्यार्थ्यांत नाराजी
Published on

उशिरा लागलेल्या सुट्ट्यांमुळे पालक-विद्यार्थ्यांत नाराजी
परीक्षा, पडताळणी प्रक्रियेमुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत; दहावीच्या अभ्यासालाही उशीर
जुईनगर, ता. २२ (बातमीदार): राज्यातील अनेक शाळांमध्ये सुरू असलेल्या पॅट परीक्षा, पटपडताळणी आणि इतर शैक्षणिक प्रक्रियांमुळे यंदा उन्हाळी सुट्ट्या उशिरा लागल्या आहेत. एप्रिलचा तिसरा आठवडा संपत आला तरी अनेक शाळा सुरूच असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा संपून सुट्ट्या लागतात. मात्र यंदा नियोजन ढासळल्याने विद्यार्थ्यांच्या सुट्टीचे नियोजन कोलमडले आहे. गावाला जाणे, नातेवाईकांना भेटणे किंवा छंदवर्गात सहभागी होण्याच्या योजना रद्द कराव्या लागत आहेत. वाढत्या उष्णतेत शाळेत जावे लागल्याने विद्यार्थ्यांचा त्रासही वाढला आहे.
याशिवाय चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा महिन्याच्या शेवटी असल्याने लग्नसराईच्या हंगामात कुटुंबीयांना कार्यक्रमांना उपस्थित राहणे कठीण झाले आहे. काही शाळांमध्ये नववीच्या परीक्षा सुरू असल्याने दहावीचा अभ्यास उशिरा सुरू होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
दरम्यान, शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने शाळांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा सुट्टीचा कालावधी कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या विश्रांतीवरही परिणाम होणार आहे.
चौकट
दहावीचे वर्गाला विलंब
नववीच्या परीक्षा उशिरा सुरू असल्यामुळे दहावीच्या अभ्यासक्रमाला उशीर होत आहे. आमच्या शाळेत अजून नववीच्या परीक्षा सुरू असल्याने मुलांना दहावीचा अभ्यास वेळेवर सुरू करता येत नाही, अशी नाराजी पालक संतोष रसाळ यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com