स्वच्छता अधिभार लागू झाल्याने २ रुपये तिकीट झाले सक्तीचे

स्वच्छता अधिभार लागू झाल्याने २ रुपये तिकीट झाले सक्तीचे
Published on

एसटीचा स्वच्छता अधिभार लागू
ज्येष्ठांनाही दोन रुपयांच्या तिकिटाची सक्ती

जव्हार, ता. २२ (बातमीदार) : मागील आठवड्याच्या बुधवार (ता. १५) पासून एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी स्वच्छता अधिभार लागू झाला आहे. हा अधिभार लागू झाल्याने मोफत सेवा घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता दोन रुपयांचे तिकीट सक्तीचे झाले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांत संतापाची लाट असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य परिवहन मंडळाने प्रवास भाड्यात ‘स्वच्छता अधिभार’ लागू केला आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत मोफतचा प्रवास लाभ घेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना किमान दोन रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे वाहतुकीसाठी स्वच्छ बसेस उपलब्ध करून देणे तसेच बस स्थानकाची स्वच्छता ठेवण्यासाठी महामंडळाने प्रवास भाड्यात स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता मोहिमेसह उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने मंडळाने हा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या नव्या निर्णयाची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून करण्यात आली असून, सर्व प्रकारच्या तिकिटांवर हा अधिभार लागू करण्यात आला आहे. स्वच्छता, बस स्थानके आणि बसची देखभाल यासाठी अतिरिक्त निधी उभारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

एसटी बस व बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक तिकिटावर दोन रुपये स्वच्छता अधिभार लावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार १५ एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती जव्हारचे आगारप्रमुख बाळासाहेब झरीकर यांनी दिली.
-----------
सुट्ट्या पैशांवरून वाद

महामंडळाच्या या स्तुत्य उपक्रमात सुट्ट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये वाद होऊ शकतो, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिक अमृत योजनेच्या माध्यमातून एसटीचा मोफत प्रवास करीत असतात. मात्र स्वच्छतेचा अधिभार लागू झाल्याने त्यांचा प्रवास आता मोफत राहिलेला नाही. कारण त्यांनाही किमान दोन रुपये भरून तिकीट काढावे लागणार आहे. स्वच्छतेसाठी अधिभार आवश्यक असल्याचे त्यांनी मान्य केले आहे, मात्र यातून ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
-------------------
महिला, ६५ वर्षांवरील प्रवाशांना अर्धे तिकीट लागू केले. ७५ वर्षे वयावरील प्रवाशांना मोफत प्रवास सुविधा देण्यात आली. मात्र सध्या अचानक दोन रुपये स्वच्छता अधिभार लागू केल्याने वृद्धांना मोफत प्रवास ही संकल्पना खोटी ठरत आहे.
- काशिनाथ दरोडा, वृद्ध प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com