

भोंदूबाबा कॅसिनोप्रेमी
१२ तोळे सोने, एक लाखाची रोकड जप्त
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : गेल्या काही दिवसांमध्ये भोंदूबाबांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ठाण्यातील उच्चभ्रू वस्तीतील एका कुटुंबाला काळी जादू झाल्याची भीती दाखवत अघोरी विधीच्या नावाखाली करोडो रुपये लुबाडणाऱ्या कर्नाटकमधील भोंदूबाबा मंजुनाथ सुंदर शेट्टी ऊर्फ दीक्षित बाबा (वय ३५) याला ठाणे पोलिसांनी अटक केली. हा बाबा रंगीन मिजासी असून तो कॅसिनोप्रेमी असल्याचे तपासात समोर आले.
कॅसिनोचा नाद पूर्ण करण्यासाठी तो महाराष्ट्रातून गोव्यात जात असे. विमान प्रवासासाठी तो हे पैसे वापरत होता. तर, तपासात त्याच्याकडून १२ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या गोव्यातून आवळल्या. तपासात त्याने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्कार व आर्थिक अपहार, तर वर्तकनगर पोलिस ठाण्यात विनयभंग व फसवणूक असे महिलांसंदर्भात गंभीर गुन्हे केल्याची बाब तपासात समोर आली आहे. तसेच तो अविवाहित असून त्याला कॅसिनोचा नाद लागला होता. पैशांसाठी नागरिकांना तो खोटे सांगून पैसे उकळत असे आणि कॅसिनोमध्ये उडवत असे. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेने त्याच्याकडून १२ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड जप्त केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.