आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना वेतनदिलासा

आदर्श महाविद्यालयातील 
शिक्षकांना वेतनदिलासा
Published on

आदर्श महाविद्यालयातील
शिक्षकांना वेतनदिलासा

मुंबई, ता. २२ ः राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पदभरतीत अतिरिक्त गुण देण्यासह आर्थिक तरतुदींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयांना प्रत्येकी एक प्राचार्य व मानद प्राध्यापक नियुक्तीच्या धोरणासही मान्यता देण्यात आली असून यातील शिक्षकांना विद्यार्थी संख्येच्या वाढीच्या गुणोत्तरानुसार तसेच केंद्राकडून मिळणारा अनुदानाचा हिस्सा वगळता, द्यावयाच्या राज्याच्या हिश्श्याची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने देशातील ज्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय नोंदणी दरापेक्षा कमी विद्यार्थी नोंदणी असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श महाविद्यालय सुरू करण्याची योजना अकराव्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली. त्यानुसार जालना जिल्ह्यात घनसावंगी, बुलडाणा, श्रीवर्धन, हिंगोली, गडचिरोली, आंबवडे आणि तळेरे येथे आदर्श महाविद्यालये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com