मेट्रो-२ बी ला चित्रीकरणाचा आधार

मेट्रो-२ बी ला चित्रीकरणाचा आधार
Published on

‘मेट्रो-२ बी’ चित्रीकरणाचा आधार
पहिल्याच महिन्यात २० लाखांची कमाई
मुंबई, ता. २२ : अंधेरी पश्चिम-मंडाळे मेट्रो-२ बी मार्गिकेवरील डायमंड गार्डन-मंडाळे पहिल्या टप्प्याला प्रवाशांना फारसा प्रतिसाद मिळत नसला, तरी व्यावसायिक चित्रिकरणातून एमएमआरडीएला आधार मिळत आहे. या मार्गावर नुकतेच व्यावसायिक जाहिरातीचे चित्रिकरण झाले असून त्यामाध्यमातून २०.३५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. भविष्यातही मेट्रोला चित्रिकरणाच्या माध्यमातून मोठा महसूल मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एमएमआरडीएने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विविध सुविधांचा बहुउद्देशीय वापर करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मेट्रो-२ बी मार्गिकेवर मंडाले मेट्रो स्थानकात आणि मेट्रोमध्ये चित्रीकरण करण्यात आले. मेट्रो ही केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित न राहता बहुआयामी नागरी मालमत्ता म्हणून नावारूपास येत आहे. भाडेआधारित उत्पन्नावरील अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करीत आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा हा भाग आहे.
----
वर्षनिहाय महसूल
२०२४-२५ : २०.४१ लाख
२०२५-२६ : २५.९६ लाख
२०२६-२७ : २०.३५ लाख
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com