पालिका सभागृहातील लटकत्या माईकबाबत नगरसेवकांची नाराजी

पालिका सभागृहातील लटकत्या माईकबाबत नगरसेवकांची नाराजी
Published on

लटकत्या माईकबाबत नगरसेवकांची नाराजी
मुंबई, ता. २२ ः आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका सभागृहातील लटकत्या माईकबाबत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जात असताना लटकते माईक मुंबईकरांना दाखविणार काय? पालिकेच्या लौकिकाला हे शोभत नाही, अशी नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली. सभागृहनेते नेते गणेश खणकर यांनी स्थायी समितीत आज हा प्रश्न उपस्थित केला. गेल्या तीन महिन्यांपासून सभागृहातील माईक प्रणाली सुधारण्याची मागणी केली जात आहे; मात्र त्यात काहीही बदल झाला नसल्याचे ते म्हणाले. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन आयुक्तांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com