

कल्याण, ता. २२ (बातमीदार) : रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या महिलेने अंतिम श्वास घेतला. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी फरार रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे.
रेखा उत्तम कासुर्डे (वय ६८) या खंबाळपाडा परिसरात आपल्या मुलाकडे वास्तव्यास होत्या. दहा दिवसांपूर्वी त्या शेलार नाका ते मंजुनाथ शाळा या दरम्यानच्या रस्त्यावरून पायी जात होत्या. रस्ता ओलांडत असताना एका रिक्षाने त्यांना अतिवेगात येऊन धडक दिली. त्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने एमआयडीसी निवासी विभागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तीन दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.