उपायुक्त डॉ.कैलास गायकवाड यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत

उपायुक्त डॉ.कैलास गायकवाड यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत
Published on

गायकवाड यांना पोलिस कोठडी
एसीबीच्या घरझडतीत सोने, रोकड जप्त
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजारांची लाच घेताना पकडल्यानंतर एसीबीने त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे डॉ. गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मंगळवारी सायंकाळी अटकेची कारवाई केल्यानंतर नवी मुंबई एसीबीच्या पथकाने डॉ. गायकवाड यांच्या निवासस्थानी रात्रभर झडती घेतली. या झडतीमध्ये गायकवाड यांच्या घरात ३८ तोळे सोन्याचे दागिने सापडले. तसेच अडीच लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. तपासादरम्यान गायकवाड यांच्या नावावर दोन आलिशान फ्लॅट असल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.
अँटीकरप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके आणि त्यांच्या पथकाने बुधवारी डॉ. गायकवाड यांना न्यायालयात हजर केले. एसीबीने या प्रकरणाच्या अधिक सखोल तपासासाठी आणि उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेच्या संशयावरून पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने गायकवाड यांना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली असून, त्यात सोने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. या मालमत्तेच्या स्रोतांबाबत सध्या तपास सुरू असल्याची माहिती नवी मुंबई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली.
----
मूळ प्रकरण
कंत्राटदार दशरथ सुरवसे यांनी ऐरोली विभागात अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी वाहने पुरवली होती. या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी आणि चेकवर सही करण्यासाठी गायकवाड यांनी ४२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मंगळवारी पालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर डॉ. गायकवाड यांच्या दालनात लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना एसीबीने पकडले.

अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
मुख्यालयात झालेली अटक आणि त्यानंतर घरात सापडलेले घबाड यामुळे नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गायकवाड यांच्या संपर्कात असणारे इतर अधिकारी आणि कंत्राटदारही आता एसीबीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com