भिवंडीत पाणीटंचाईवरून आमदार रईस शेख आक्रमक

भिवंडीत पाणीटंचाईवरून आमदार रईस शेख आक्रमक
Published on

भिवंडी, ता. २२ : शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध ११५ एमएलडी पाणीपुरवठा पुरेसा असतानाही नियोजनाच्या अभावामुळे अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई भासत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार रईस शेख यांनी दिला आहे.
पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. या वेळी उपमहापौर तारिक मोमिन तसेच नगरसेवक उपस्थित होते. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करताना आमदार शेख यांनी सरकारकडून मंजूर १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा प्रकल्पाबाबतही प्रश्न उपस्थित केला. या योजनेची अंमलबजावणी पालिका स्तरावर संथ गतीने सुरू असून, त्यामागील अडचणी नेमक्या काय आहेत, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत, परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com